gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न

shivaji-maharaj-rajyabhishek

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ६ जून २०२२ हा दिवस शिवराज्याभिषेक दिन हा  ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झाला. रत्नागिरीतील १३ क्लस्टर कॉलेज यात सहभागी झाली होती. दहा वाजता मारूती मंदिर पासून रॅलीने सुरूवात झाली. ज्यामध्ये देव-घैसास-कीर महाविद्यालय, नवनिर्माण महाविद्यालय, भागोजी कीर विधी महाविद्यालय यातील साठ-सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते.  रॅलीनंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सेमिनार हॉलमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिवाजी महाराजांची भूमिका हिंदवी स्वराज्याची म्हणजे एतद्देशियांच्या राज्याची होती आणि म्हणूनच शिवस्वराज्य दिन साजरा करण्यासाठी, शिवरायांचे चरित्र डोळसपणे वाचण्यासाठी, सांगण्यासाठी, आचरण्यासाठी हा दिवस साजरा करीत आहोत” असा शिवस्वराज्य दिन संपन्न करण्या पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला.

शिवराज्याभिषेक दिनी अभ्यागत व्याख्याते गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्राध्यापक पंकज घाटे यांनी  “शिवराज्याभिषेकाचे एक सूत्र” या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. “जमिन जिंकून घेणं, राज्याभिषेक करून नवी वहीवाट तयार करणं, देशी भाषांना हक्काचं स्थान देणं, लोकमान्यता मिळवणं, भूप्रदेशाचा विस्तार करणं, किल्ले बांधण्याची कला, आरमाराची विशालदृष्टी, नकाशाज्ञान ही कार्य करून अगदी इंग्रजांकडूनही पूर्वेकडील मोठा राजकर्ता हा नावलौकिक मिळवणारा शिवाजी रयतेचा राजा होता. जिथे जिथे मराठ्यांचं पाऊल पडलं तो प्रत्येक भाग आज भारतात आहे, याचे श्रेय शिवरायांना आहे. “असे विचार व्यक्त केले.

शासकीय अध्यापक महाविद्यालय कार्यक्रम समन्वयक राजश्री देशपांडे, कार्यक्रमाला तंत्र सहाय्य करणारे प्रा. प्रशांत लोंढे यांचे सहकार्य कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघना म्हादये यांनी केले.  विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी,  कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई,  ऑनलाईन ४१ व ऑफलाईन ८० शिवप्रेमी विद्यार्थी शिक्षकांनी यात सहभाग घेतला.

shivaji-maharaj-rajyabhishek
Comments are closed.