gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एन.आय.आय.टी. मुंबईतर्फे आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि एन.आय.आय.टी. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खाजगी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य अशा आय.सी.आय.सी.आय. बँकेत रिलेशनशिप मॅनेजर या पदाकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ७ जून २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये ही प्रक्रिया चालू होईल. याकरिता महाविद्यालयातून पदवी घेतलेले तसेच पदवीची अंतिम सत्राची परीक्षा दिलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित्त राहू शकतात. याकरिता वय २५ वर्षे ६ महिने पेक्षा जास्त नसलेले विद्यार्थी पात्र ठरू शकतात. मुलाखतीसाठी सोबत येताना पदवीपर्यंतची गुणपत्रे, पॅनकार्ड, आधारकार्ड, फोटो, बायो-डेटा इ. कागदपत्रे घेऊन यावीत. अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत मोबा. ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर मुलाखतींसाठी उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.