gogate-college-autonomous-logo

राष्ट्रीय परिषदेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे यश

gjc-microbiology-department-national-conference-2020

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. सदर परिषद ‘पाणथळ परिसंस्था, जैवविविधता संवर्धन आणि व्यस्थापन’ या विषयावर नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर परिषद ‘जागतिक पाणथळ दिनाचे’ औचित्य साधून न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा आणि मॅग्रूव्ह सोसायटी ऑफ इंडिया, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेमध्ये तोंडी सादरीकरण व भित्तीपत्रक सादरीकरण अशा स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंदा बेर्डे यांना तोंडी सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धेत कु. मधुश्री कदम (एम.एस्सी.) हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. केदार मुळ्ये, इरम हाजू, कु. समीक्षा शिवलकर आणि विराज पावसकर यांना स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांना प्रा. सुरज वासावे आणि प्रा. प्रचिती राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि उपप्राचार्य विवेक भिडे यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.