gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. वि. के. बावडेकर व्याखानमाला संपन्न

gjc-bavdekar-vyakhanmala-2020

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात माजी प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाली. या व्याख्यानमालेचे ३४ वे पुष्प रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील अधिष्ठाता डॉ. सुनील भागवत यांनी गुंफले. शाश्वत ऊर्जा आणि संवर्धन, ऊपयोगिता व साठवण कशाप्रकारे केली पाहिजे, या शाश्वत उर्जेमधील सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे सौर ऊर्जा त्याचा वापर आपण विविध क्षेत्रामध्ये कशाप्रकारे करू शकतो, मग त्यात सौर उर्जेची साठवण व रूपांतरण याबद्दल माहिती देऊन त्याचा वापर वीजनिर्मिती, सौर कुकर, सौर शीतपेटी अशा माध्यमातून ससा करू शकतो ते विषद केले. तसेच पाण्याची साठवण व त्यापासून होणारी वीजनिर्मिती याबाबत विवेचन केले. माणसाची उत्क्रांती त्याच्या शोधक वृत्तीतून झाली असे सांगून त्याने लावलेला उष्णतेचा शोध आणि त्याच्या आधारावर मानवाचा झालेला विकास व जडणघडण यावरही प्रकाश टाकला. विजेचा वापर, तयार होणारा कार्बनडाय ऑक्साईड, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि उपाययोजना आपल्या ओघवत्या शैलीतून विषद केल्या. डॉ. मेघना म्हादये यांनी प्रमुख वक्ते डॉ. भागवत यांचा परिचय करून दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘जीवनात काय मिळवायचे आहे आणि कसे मिळवायचे याचा विचार करून पायरी चढायला सुरुवात केली पाहिजे’ असे सांगून उपस्थितांशी संवाद साधला.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी माजी प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. १९४५ या वर्षी रसायनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झालेले डॉ. बावडेकर १९७६ साली प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. उत्तम शिक्षक, प्रशिक्षक आणि उत्तम प्रशासक म्हणून गौरविलेले डॉ. बावडेकर ‘दुर्गम भागातील विद्यार्थी घडविणे हेच ध्येय त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनप्रवासात जपले’, असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा घड्याळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. शरद आपटे यांनी केले. या व्याख्यानमालेकरिता शहरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

gjc-bavdekar-vyakhanmala-2020
gjc-bavdekar-vyakhanmala-2020
Comments are closed.