gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात फूड फेस्टिवल संपन्न

food-festival-in-microbiology-department

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आणि मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ‘मायक्रोबायोम फूड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले होते. या खाद्यमहोत्सवामध्ये किण्वन प्रक्रियेतून बनविलेले वेगवेगळे पदार्थ ते पदार्थ बनविण्याची प्रक्रिया आणि या प्रक्रियेमध्ये असलेली सूक्ष्मजीवांची भूमिका यावर भित्तीपत्रक सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य विवेक भिडे यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत विभागप्रमुख डॉ. चंदा बेर्डे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. वर्षा घड्याळे आणि विभागातील प्राध्यपक उपस्थित होते.

खाद्य महोत्सवामद्धे ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सहभागी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी पदार्थांचे सूक्ष्मजीवशास्त्र समजून घेऊन पदार्थांचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Comments are closed.