gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. के. व्ही. कुलकर्णी स्मृतिगंध या कार्यक्रमाचे दि. २८ फेब्रुवारी रोजी आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात प्रदीर्घ काळ सेवा करणारे प्राध्यापक कै. के. व्ही. कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘कै. प्रा. के. व्ही. कुलकर्णी स्मृतिगंध’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये ‘केव्ही’ या नावाने कुलकर्णी सर लोकप्रिय होते. ऑरग्यानीक केमिस्ट्री हा विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. आपले एम.एस्सी. ऑरग्यानीक केमिस्ट्री पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १९७३ साली गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डेमाँनस्ट्रेटर म्हणून रुजू झाले. १९७८ साली त्यांची प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली. २०२२ या वर्षी आपल्या नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते पुढे जवळजवळ १५ वर्ष महाविद्यालयात ज्ञानदानासाठी येत होते.

आपल्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य केले. ऑरग्यानीक केमिस्ट्री या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या विषयाचा पाया पक्का करण्याचे काम ते अत्यंत कौशल्याने करत आले. त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चशिक्षण घेऊन विविध क्षेत्रात महत्वाची पदे भूषवत आहेत. सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आपल्या करिअरला योग्य दिशा मिळाल्याची भावना अनेक माजी विद्यार्थी वेळोवेळी व्यक्त करतात.

एक आदर्श शिक्षकाबरोबरच एक उत्तम चित्रकार म्हणून देखील त्यांची ओळख होती. टिळक आळीतील काळे वाड्यातील त्यांचे दोन खोल्यांचे घर त्यांच्या सुंदर अशा निसर्गचित्रांनी भरलेले असे. २०१७ यावर्षी वार्धक्यामुळे ते रत्नागिरी सोडून पुण्याला कुटुंबीयांकडे गेले. दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी पार्किन्सन आजाराने त्यांचे निधन झाले.

२८ फेब्रुवारी हा सरांचा जन्मदिवस. त्यामुळे दि. २८ फेब्रुवारीचे औचित्य साधून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग आणि रसायनशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी यांनी एकत्रितपणे ‘कै. प्रा. के. व्ही. कुलकर्णी स्मृतिगंध’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा रसायनशास्त्र विभाग आणि रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी एकत्रितपणे ‘कै. प्रा. के. व्ही. कुलकर्णी स्मृतिगंध’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. के.व्ही. सरांना विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विविध ठिकाणी असणारे विद्यार्थी’ सहकारी यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.