gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात माजी विभागप्रमुख कै. प्रा. पी. एन. देशमुख स्मृती कार्यक्रम संपन्न

gjc-botany-department-programme-feb-2022

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने कै. प्रा. पी. एन. देशमुख चतुर्थ स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे माजी विभागप्रमुख प्रा. पी. एन. देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कन्या डॉ. मंजुश्री देवधर यांनी दिलेल्या देणगीतून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी तसेच शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्याप्रारंभी कै. प्रा. पी. एन. देशमुख यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींवरती जास्तीत जास्त समाजोपयोगी संशोधन करण्याचे आवाहन केले.’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी विभाग प्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी व डॉ. मंगल पटवर्धन यांनी देशमुख सरांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सरांच्या कन्या डॉ. मंजुश्री देवधर यांनी गुगल मिटद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या आठवणीतील देशमुख सरांविषयी माहिती सांगितली.

सदर कार्यक्रमादरम्यान प्रा. महेश गोखले, के. बी. पी. कॉलेज, इस्लामपूर यांचे ‘औषधी वनस्पती आणि कोकणातील औषधी वनस्पतींशी निगडीत परंपरा’ या विषयावरील व्याख्यान झाले. त्यांनी सर्पगंधा, हिरडा, बेहडा, रिठा, कुवळे, कवंडळ, काटेरिंगणी, भुईचाफा, इ. वनस्पतींशी निगडीत परंपरा आणि त्यांचे औषधी गुणांबद्दल माहिती दिली. तसेच औषधी वनस्पतींचा साठा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

त्यानंतर पी.पी.टी. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीच्या स्पर्धेचा विषय ‘औषधी वनस्पती’ असा होता. प्रथम क्रमांक साहिल आलीम, तृतीय वर्ष विज्ञान; द्वितीय क्रमांक मानसी करंदीकर, तृतीय वर्ष विज्ञान; तृतीय क्रमांक साक्षी साळवी, तृतीय वर्ष विज्ञान; उत्तेजनार्थ पारितोषिक प्राजक्ता कदम, प्रथम वर्ष विज्ञान यांनी प्राप्त केले. माजी विभागप्रमुख प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या देणगीतून विजेत्यांना ही पारितोषिके दिली जातात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. शरद आपटे, पाहुण्यांची ओळख डॉ. सोनाली कदम, सूत्रसंचालनप्रा. ऋतुजा गोडबोले यांनी तर आभारप्रदर्शन सौ. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी केले.

Comments are closed.