gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक कौशल्य दिन साजरा

placement-cell-world-skills-day

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व ध्येय अॅकॅडमी ऑफ स्कील डेव्हलपमेंट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत बॉश इंडिया लि.चा ‘ब्रीज’ नावाचा एम्प्लॉयबिलिटी कोर्स चालविला जातो. या कोर्सची दुसरी बॅच सध्या सुरु आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यांकडून जागतिक कौशल्य विकास दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे दि. १५ जुलै २०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अॅकॅडमीच्या डायरेक्टर सौ. पुजेश्वरी कदम, श्री. राधेय पंडित, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत उपस्थित होते. तसेच स्टार युनियन डाई-इची या इन्शुरन्स कंपनीचे रत्नागिरीतील पदभार असलेले श्री. अमित खानविलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विशेष किटचे वाटप बॉश कंपनीतर्फे करण्यात आले. दोन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.

Comments are closed.