gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे लोकमान्य टिळक गणित प्रज्ञा परीक्षा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे प्रतिवर्षी लोकमान्य टिळक गणित प्रज्ञा परीक्षेचे आयोजन केले जाते. सदर परीक्षा इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे परीक्षेचे संपूर्ण नियोजन हे एम.एस्सी.चे विद्यार्थी करतात.

विद्यमानवर्षीही गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख प्रा. अनिल उरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० सप्टेंबर २०१७ रोजी रोजी सदर परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना ‘इंटरनॅशनल ऑलिंपियाड ऑफ मॅथॅमॅटिक्स’मध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते.

Comments are closed.
 
  • 2020 (11)
  • 2019 (161)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)