gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. प्रशांत बनसोडे यांचे व्याख्यान संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात डॉ. प्रशांत बनसोडे यांचे ‘कातकरी समाजाचा सामाजिक – आर्थिक विकास’ या विषयावरील व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील सामाजिक शास्त्र मंडळाच्यावतीने गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था, पुणे येथील अधिष्ठाता डॉ. प्रशांत बनसोडे यांचे ‘कातकरी समाजाचा सामाजिक- आर्थिक विकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपले विचार मांडताना डॉ. बनसोडे म्हणाले, विश्व राजकारणात पहिले, दुसरे आणि तिसरे जग आहे तसे आपला देश, आपल्या राज्यात आदिवासींचे चौथे जगही आहे. १९९० च्या दशकानंतर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणामुळे सर्व जग जवळ आले आणि त्यामुळे विकासाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पण या नव्या पर्वात एक समाज नव्हता तो म्हणजे आदिवासी समाज होय.

महाराष्ट्र राज्यात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, धुळे,  नंदुरबार, जळगाव, नाशिक, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने विविध आदिवासी जमाती आढळतात. या जमातीपैकी एक म्हणजे कातकरी जमात होय. आजही कातकरी आदिवासी समाज विकासाच्या बाबतीत मागसलेला असून, या समाजाचा आर्थिक- सामजिक विकास पुरेसा झालेला नाही, त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगीकला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, सामाजिक शास्त्र मंडळाचे प्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे आदि मान्यवरांसह विविध शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.