gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कम अँड लर्न फिजिक्स – अ फिजिक्स फेअर’ उपक्रम संपन्न

GJC_PHYSICS_FAIR_2023

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांशी संबंधित ‘कम अँड लर्न फिजिक्स – अ फिजिक्स फेअर’ हा उपक्रम दि. 25 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला. यामध्ये इ. ९ वीच्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग मांडण्यात आले होते. उर्जा, ध्वनी, प्रकाश, प्रकाशाचा वर्णपट, अनुनाद, पृष्ठताण, विद्युत चुंबकीय परिणाम, निरीक्षण आणि मापन यांचे महत्त्व सांगणारे असे विविध प्रयोग आयोजित करण्यात आले आणि प्रतिकृतींचा वापर संकल्पना स्पष्ट होण्यासाठी करण्यात आला.

महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी सदर प्रयोगांची मांडणी केली व शालेय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यातील वैज्ञानिक तत्वे प्रयोगांसह समजावून सांगितली. या प्रदर्शनाचा जीजीपीएस, शिर्के प्रशाला आणि सौ गोदुताई जांभेकर विद्यालयातील जवळजवळ 90 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने सदर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.

सदर उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी पी कुलकर्णी आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली. हा सुनियोजित उपक्रम भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश बेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागातील इतर प्राध्यापक व प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.

 

Comments are closed.