gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचा ‘कोविड- १९’ जनजागृतीपर झंझावाती दौरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचा ‘कोविड- १९’ जनजागृतीपर झंझावाती दौरा

गोगटे जोगळेकर महावयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे काम हे नेहमीच जन हिताचे राहिले आहे. समाजाच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय योजना करणे आणि स्वत: कामे करून समाजामद्धे आदर्श निर्माण करण्याहे काम हा विभाग सातत्याने करत असतो.

माहिती जनसंपर्क महासंचलनालय, मंत्रालय, मुंबई यांनी रत्नागिरी माहिती कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत आधार सेवा ट्रस्ट सह गोगटे जोगळेकर महाविद्यालातील स्वयंसेवकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील किमान २५ पथनट्यांचे सादरीकरण करून कोविड महामारीच्या काळात जनजीवन पुन्हा सुरु होत असताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत जनजागृती केली. सदर पथनाट्ये चिपळूण तालुक्यात कापसाळ, कामथे, फारशी फाटा, चिंचनाका, गुहागर नाका वहाळ फाटा, मिरजोळी, वालोपे आणि असुर्डे येथे गुहागर तालुक्यात अंजनवेल, पालशेत, वेळणेश्वर, हेदवी, गुहागर स्टॅड, मार्ग ताम्हाणे येथे संगमेश्वर तालुक्यात डिंगणी, ओझरे, धामापूर, संगमेश्वर स्टॅड येथे तर रत्नागिरी तालुक्यात बाजारपेठ, नाचणे, गोळप, पावस, गावखडी, भाट्ये आणि चांदोर येथे संपन्न झाली.

Comments are closed.