gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कॅम्पस ड्राईव्ह’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे आणि स्कॉलर कट्टा सोल्युशन्स प्रा. लि. पुणे यांचेतर्फे दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२.३० पासून ‘कॅम्पस ड्राईव्ह’ अंतर्गत मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कंपनीमध्ये रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर इ. ठिकाणी ‘युनिट हेड/ मॅनेजर’ या पदांकरिता सदर मुलाखती होत आहेत.

महाविद्यालयातून २०१९-२० या शैक्षणिक वर्षात पदवी घेऊन बाहेर पडलेले इच्छुक विद्यार्थी सदर मुलाखातींकरिता उपस्थित राहू शकतात. विद्यार्थ्यांनी सोबत येताना मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे तसेच आपला बायोडेटा अशी आवश्यक माहिती घेऊन येणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. रुपेश सावंत ९४२११४२५२९, डॉ. उमेश संकपाळ ९३५९८७००१८ किंवा डॉ. रामा सरतापे ७८८७३१७२३३ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. ७८८७३१७२३३ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.