gogate-college-autonomous-logo

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान रंजन कथा व निबंध स्पर्धा

प्रतिवर्षाप्रमाणे मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागातर्फे विज्ञानरंजन कथा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कथास्पर्धेकरिता कथा पाठविण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. या स्पर्धेकरिता केवळ कथा नको किंवा केवळ विज्ञान नको तर या दोन्हीचा मिलाफ असावा. किमान १००० आणि कमाल ३००० इतकी शब्दसंख्या असावी. कथा ए-४ आकाराच्या कागदावर एकाच बाजूस स्वहस्ताक्षरात लिहिणे गरजेचे आहे. तसेच कथा स्वत:ची असल्याचे प्रतिज्ञापत्र कथेसोबत देणे अनिवार्य आहे. सदर कथा संपूर्ण नाव, पत्ता, फोन, भ्रमणध्वनी, ई-मेल द्यावा. कथा कार्यवाह, मराठी विज्ञान परिषदभवन, वि. ना. पुरव मार्ग, शिव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई- ४०० ०२२ या पत्त्यावर पाठवाव्यात.

निबंध स्पर्धेकरिता विद्यार्थी गट विषय ‘दूरदर्शनसाठी विज्ञानवाहिनी’ तर खुल्या गटासाठी ‘नदीजोड प्रकल्प’ असा आहे. निबंध स्पर्धेकरिता शब्दसंख्या १५०० ते २००० असावी. लेखकाने आपले पूर्ण नाव, पत्ता, फोन, भ्रमणध्वनी, ई-मेल नमूद करावा. निबंध दि. ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ना. द. मांडगे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग, न्यू रोझ विला, खोली क्र. १, पहिला मजला, दाजी रामचंद्र मार्ग, चरई, ठाणे- ४००६०१ या पत्त्यावर पाठवावा. अधिक माहितीकरिता डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, समन्वयक, मराठी विज्ञान परिषद, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. सदर स्पर्धेसाठीची विस्तृत माहिती मध्यवर्ती कार्यालयाच्या www.mavipamumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Comments are closed.