gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बजाज अलीयांझतर्फे करिअरविषयक मार्गदर्शन व कॅम्पस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा ‘करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल’ तसेच कॉमर्स विभागातील ‘प्लानिंग फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्शुरन्स क्षेत्रातील करिअर’विषयक मार्गदर्शनाचा तसेच इच्छुक विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यू बुधवार दि. २४ जुलै २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहेत. इन्शुरन्स क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छीणारे आणि महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी या मुलाखतीकरिता सहभागी होऊ शकतात.

जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.