gogate-college

घरडा केमिकल्स लि. मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे नुकतेच एम.एस्सी. केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. लोटे-परशुराम एम.आय.डी.सी. येथील नामवंत घरडा केमिकल्स लि. या उद्योग समूहातर्फे घेण्यात आलेल्या प्राथमिक फेरीत निवड झालेल्या विद्यर्थ्यांच्या अंतिम मुलाखती घरडा केमिकल्स लि. मधील मॅन्यूफॅक्चरिंग प्लांटमध्ये घेण्यात आल्या. यामद्धे महाविद्यालयाच्या अॅनालिटीकल केमिस्ट्रीच्या हृषीकेश देसाई, योगेश आणेराव आणि प्रतिक भिडे या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, प्लेसमेंट सेलचे डॉ. उमेश संकपाळ, प्रा. रुपेश सावंत यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.