gogate-college

र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांचा सह्याद्री वाहिनीवरील ‘महाचर्चा’ कार्यक्रमात सहभाग

मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर गुरुवार दि. २६ एप्रिल २०१८ रोजी रात्रौ ८.०० ते ९.०० या वेळेत थेट प्रसारित होणाऱ्या महाचर्चा कार्यक्रमात ‘उच्च शिक्षण आणि भविष्यातील आव्हाने’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांना दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्यांच्यासोबत डॉ. सोमनाथ पाटील, सेक्रेटरी, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी (डी.पी.यू.), पुणे तसेच वेलिंग्टन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे प्राध्यापक डॉ. विजय साळुंखे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.

आज रात्री ८ वाजता थेट प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर शनिवार दि. २८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९.०० वाजता होणार असून दूरदर्शननिर्मिती श्री. जयू भाटकर यांची आहे.

Shilpatai Patwardhan
Comments are closed.