gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ९ जानेवारी रोजी ‘कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्ह’

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेलतर्फे ग्लोबल टॅलेंट डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने (एन.आय.आय.टी.) खाजगी क्षेत्रातील नामवंत अशा आय.सी.आय.सी.आय. बँकेकरीता रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन बुधवार दि. ९ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले आहे. रिक्रुटमेंट ड्राईव्ह महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये सकाळी ९.४५ पासून सुरु होईल. विद्यार्थ्यांनी सोबत तीन पासपोर्ट साईज फोटो, दहावी ते पदवीपर्यंतची गुणपत्रके, प्रमाणपत्रे, त्यांच्या फोटोप्रती, जन्म तरीखेचा पुरावा, अनुभवाचा दाखला इ. कागदपत्रांसह उपस्थित रहावे.

सदर रिक्रुटमेंट ड्राईव्हकरिता महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले २०१५ ते २०१७ या शैक्षणिक वर्षातील कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीकरिता डॉ. रुपेश सावंत (९४२११४२५२९), डॉ. उमेश संकपाळ (९३५९८७००१८), डॉ. रामा सरतापे (९४२११८६४२२) यांचेशी संपर्क साधावा.

सदर रिक्रुटमेंट ड्राईव्हकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.