gogate-college

रंगवैखरीच्या विभागीय फेरीत गोगटे जोगळेकर विजयी

Team Success in Rangvikhari

महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थातर्फे आयोजित ‘रंगवैखरी’ (पर्व दुसरे) या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग केंद्राची विभागीय अंतिम फेरी ३० डिसेंबर रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात पार पडली. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या ‘अधिक देखणे तरी’ या नाट्याविष्काराने 25000/- चे रोख पारितोषिक प्राप्त करून रत्नागिरी केंद्राचे विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेसाठी कवी अजय कांडर, ज्येष्ठ नाट्य समीक्षक श्री. रवींद्र पाथरे परीक्षक म्हणून लाभले. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या रत्नागिरी केंद्रातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांनी ‘अधिक देखणे तरी’ आणि डि.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण यांनी ‘उध्वस्त माणसाची गोष्ट’ तर सिंधुदुर्ग विभागातून श्री. स.ह. केळकर महाविद्यालय, देवगड यांनी ‘फुगडी’ आणि पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर यांनी ‘फकिरा’ या चार संघांनी आपल्या एकांकिका सादर केल्या. यातून रत्नागिरी केंद्रावरून गो.जो. महाविद्यालयातील ‘अधिक देखणे तरी’ आणि सिंधुदुर्ग केंद्राच्या स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘ फुगडी’ या एकांकीकेची निवड मुंबई येथे होणार्या अंतिम फेरीसाठी करण्यात आली. रत्नागिरी केंद्रावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संघातील अभिनय – श्रेया जोशी, अभिनय – चैत्राली लिमये, गायन – ईशानी पाटणकर, दिग्दर्शन- श्रेया जोशी यांना विशेष पारितोषिके प्राप्त झाली. त्यांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख गिरीश पतके, कवी नीळकंठ कदम, कवयित्री रश्मी कशेळकर यांची विशेष उपस्थिती लाभली. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या डाॅ. निधी पटवर्धन यांनी या संघासाठी विशेष मेहनत घेतली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी च्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, प्राचार्य डाॅ. किशोर सुखटणकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

रंगवैखरी (पर्व दुसरे) अंतिम फेरी दि. ६ जानेवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीसाठी महाराष्ट्र राज्यातील तसेच बेळगाव मधून निवडलेल्या आठ नाटयाविष्कारांचा आस्वाद घेता येणार आहे

Comments are closed.