gogate-college-autonomous-logo

अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

जोगळेकर महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर संवाद कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अत्यंत मानाचे आणि महत्वाचे असे स्थान आहे. परंतु आजच्या काळात विवाहसंस्थेला अनेक धोके निर्माण झाले असून, त्याचे विपरीत परिणाम समाजावर होत आहेत. विवाहसंस्था उत्तम जोडीदाराची निवड याविषयी विद्यार्थ्यांना विद्यार्थीदशेतच जाणीव निर्माण व्हावी, या हेतूने जोगळेकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयावर संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते श्री. वल्लभ वणजू, श्री. सचिन थिटे आणि निशा फडतरे यांनी दृक-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रेम, आकर्षण आणि जोडीदाराची विवेकी निवड अशा विविध पैलूवर आपल्या ओघवत्या शैलीत प्रकाश टाकला. आयुष्याचा जोडीदार घाईघाईने न निवडता विचारपूर्वक चर्चा, संवाद साधून निवडला पाहिजे. त्यामुळे सुखी वैवाहिक जीवनाचा मार्ग सुकर होईल; असे मत मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजीवन अध्ययन विस्तार जिल्हा समन्वयक प्रा. तुळशीदास रोकडे होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले. या संवाद कार्यशाळेत सामाजिक शास्त्र शाखेतील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

h
Comments are closed.