gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये खगोल विषयक कार्यशाळेचे दि. १४ व १५ मार्च २०१९ रोजी आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्रामार्फत ‘एक दिवसीय खगोल कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील खगोल विश्व सेंटर फोर सिटीझन सायन्स, विज्ञान भारती, विज्ञान प्रसार या संस्थांच्या सहकार्याने सदर कार्यशाळा दि. १४ आणि १५ मार्च २०१९ रोजी आयोजित करण्यात आले आहे. वैज्ञानिक पत्रकार पत्रकार व खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे आणि त्यांचे सहकारी या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

ब्रह्मांड, सौरमाला, दुर्बिणी, आकाश निरीक्षण, खगोल शास्त्रातील संधी या आणि अशा विषयावर सविस्तर माहिती देण्यात येणार असून कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांसाठी यानंतर दोन संपर्क सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राशी ९७६७९३२६०४ किंवा ९४२११३९२९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.