gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायदेविषयक तरतुदींची वस्तुस्थितीची माहिती आणि कायदेविषयक शिक्षेच्या तरतुदींविषयी जागृती करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार महाविद्यालयात ‘विधी साक्षरता क्लब’ची स्थापना करण्यात आली असून त्यानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कायद्यांची माहिती आणि जागृती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. दि. बिले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. संजीव सामंत आणि ऍड. प्राजक्ता मुळ्ये यांनी व्याख्यान, चर्चा आणि ध्वनिफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यामध्ये वाहतुकीविषयक कायदे, मोबाईलचा अतिवापर, मुली-मुलांबाबत अत्याचार विषयक कायदा यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर होते. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी ‘समाजातील विविध घटकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच आग्रही असते आणि महाविद्यालयातील विविध विभाग अशाप्रकारचे उपक्रम आयोजित करत असतात. भविष्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने आवश्यक ते समाजोउपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचा मनोदय त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वामीनी चव्हाण हिने, प्रास्ताविक प्रा. निलेश पाटील आणि आभारप्रदर्शन डॉ. सीमा कदम यांनी केले. कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, विधी साक्षरता समितीचे सदस्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. सीमा कदम, प्रा. बीना कळंबटे, प्रा. निलेश पाटील यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.

 

Law News
Law News
Law Event
Law Event
Comments are closed.