gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ओंकार जावडेकर याचे सुयश

omkar javdekar

मुंबई विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ओंकार जावडेकर याने सुयश संपादन केले आहे. त्याने गणित विभागातुन ९८.६३% गुण प्राप्त करत महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. ओंकार याने यापूर्वी अनेक गणिताशी संबंधित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमद्धे उज्ज्वल असे यश प्राप्त केले आहे. गणित विभागाचा निकाल ७४% लागला असून ९ विद्यार्थ्यांना ‘ओ’ ग्रेड प्राप्त झाली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे, गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.