gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि शिरगाव ग्रामपंचायत यांच्या सहयोगाने ‘स्वच्छ भारत इंटर्नशिप अभियान’ संपन्न

भारत सरकारचे ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिरगाव येथे स्वच्छताविषयक जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी प्रभातफेऱ्या, गावातील स्वच्छता करणे, घराघरात जाऊन स्वच्छतेचे महत्व विषयक करणे तसेच गावातील शाळांना भेटी देणे तेथील विद्यार्थ्यांना स्वच्छता विषयक चित्रफिती दाखविल्या आणि शाळेचा परिसर स्वच्छ करणे असे विविध कार्यक्रम हाती घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि शिरगाव ग्रामपंचायतिच्या प्रथम नागरिक सौ. वैशाली गावडे यांनी दिलेल्या स्वच्छता संदेशाने झाला. कार्यक्रमाला गावातील ग्रामविकास अधिकारी श्री. वासुदेव सावते, इतर कर्मचारी, महाविद्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवर यांचे शिरगाव ग्रामपंचायतिच्या वतीने चंदनाचे झाड देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि सरपंच सौ. वैशाली गावडे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षरोपण संपन्न झाले.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात वाढते प्रदूषण व रोगराई यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्याकरिता वृक्षारोपण इ. उपक्रम सर्व गाव आणि शहरांमध्ये राबवणे हे भविष्यकाळासाठी फार उपयुक्त ठरणारे राहील.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि अतिशय उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले.

Swatchcha Bharat
Swatchcha Bharat
Swatchcha Bharat
Swatchcha Bharat
Swatchcha Bharat
Swatchcha Bharat
Comments are closed.