gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. श्रुती जाधव आणि कु. प्रतीक्षा साळवी यांची नेत्रदीपक कामगिरी

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला योगा स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची कु. श्रुती जाधव या विद्यार्थिनीला रौप्य पदक प्राप्त झाले असून तिची अखिल भारतीय आंतर महाविद्यालयीन महिला योगा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. तसेच मुंबई विद्यापीठ आणि के. सी. जैन महाविद्यालय, चर्चगेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कु. प्रतीक्षा साळवी हिची मुंबई विद्यापीठ संघात निवड झाली आहे.

कु. श्रुती जाधव आणि कु. प्रतीक्षा साळवी यांच्या पुढील वाटचालीस रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सातीशजी शेवडे, जिमखाना समिती सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

h
h
Comments are closed.