gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता ‘येस बँक’ येथे नोकरीची संधी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल व ठाणे येथील करिअर क्राफ्ट हि एम्प्लॉयमेंट अ‍ॅडव्हायजर  एल.एल.पी. यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ८ जून २०२३ रोजी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे इंटरव्ह्यू हे येस बँकेतील सेल्स ऑफिसर या पदांकरिता रत्नागिरी ब्रांचमध्ये भरावयाच्या जागांकरिता होणार आहेत. याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी येस बँक, पर्णिका एम्पायर, शिवाजी नगर येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे. सोबत येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणावीत. या मुलाखतीसाठी २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये पदवी घेऊन बाहेर पडलेले तसेच २०२२-२३ या वर्षामध्ये पदवी परीक्षा दिलेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी पत्र असतील.

अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, मोबा. ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य  डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले अहे.

 

Comments are closed.