gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पेटंटविषयक दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पेटंटविषयक दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आय.पी.आर.समितीतर्फे पेटंट कार्यालय, मुंबई यांच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘पेटंट ड्राफ्टीग आणि फायलिंग’ या विषयावरील कार्य्धला नुकतीच आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेला कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखांतील पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते. सुमारे १६० अधिक विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि विविध विभागातील प्राध्यापकही सदर कार्यशाळेत सहभागी झाले होते.

कार्यशाळेत पेटंट आणि डिझाईन एक्झामिनर, पेटंट कार्यालय, मुंबई येथील श्री. जतीन दर्वे हे मार्गदर्शक म्हणून उपस्तीत होते. चार सत्रांमध्ये सदर कार्यशाळा पार पडली. त्यांनी पेटंट प्राप्त करण्याची कार्यपद्धती, कायदेशीर व तांत्रिक बाबी, काही उदाहरणे, विविध अर्जांचे नमुने, इतर दस्तावेज तसेच घ्यावयाची काळजी इ. विषयी पीपीटीद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना नावोन्मेश आणि संशोधनाकडे वळण्याचा सल्ला दिला. तसेच अशाप्रकारच्या कार्यशाळामधून प्रेरणा घेऊन देशात भविष्यातील संशोधक घडतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रुपेश सावंत यांनी तर यशस्वी नियोजन आणि आभारप्रदर्शन डॉ. मयूर देसाई यांनी केले. यावेळी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी उपस्थित होत्या. कार्यशाळा यशस्वी होण्याकरिता विविध विभागातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

पेटंटविषयक दोन दिवसीय कार्यशाळा पेटंटविषयक दोन दिवसीय कार्यशाळा
Comments are closed.