gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘महिला दिन’ विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘महिला दिन’ विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे नुकताच महिला प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करून ‘महिला दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नोकरदार महिला घर, संसार, नोकरी अशी तारेवरची कसरत करत असताना सतत तणावाला सामोरे जावे लागते. या महिला दिनाला हा सर्व तणाव बाजूला ठेऊन सर्वांनी आनंद साजरा करावा या हेतूने महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे ‘स्नेहसंमेलन’ आयोजित करण्यात आले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन महिला दिनाची रंगत वाढवली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ‘स्वातंत्र्य आणि सन्मान’ या दोन्ही गोष्टी स्त्रियांसाठी महत्वाच्या असून मिळालेल्या स्वातंत्र्याचा सुयोग्य उपयोग करून विविध क्षेत्रात स्त्रिया उत्तुंग कामगिरी करत आहेत, असे प्रतिपादन केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील महिला प्राध्यापक आणि कर्मचारी महाविद्यालयाचे नांव अधिक मोठे करण्यासाठी झटत असून आजच्या कार्यक्रमातून त्या नवीन उर्जा घेऊन बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाविद्यालयातील महिला प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी विविध प्रकारचे फनी गेम्स, गाणी, नृत्य, विविध विषयांवर चर्चा आणि संगीताच्या तालावर केलेला रॅम्पवॉक अशा विविध गोष्टींचा मनोसोक्त आनंद घेत अनौपचारिक वातावरणात महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. स्वत:च्या जबाबदारीतून थोडी मोकळीक घेऊन अतिशय हलक्याफुलक्या वातावरणात संपन्न झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रम भरपूर आनंद देऊन गेल्याची भावना उपस्थित सर्व महिला प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. अतिका राजवाडकर व प्रा. आरती पोटफोडे यांनी पार पाडली.

Comments are closed.