gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात महावितरण अॅप संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळातर्फे दि. २० सप्टेंबर २०१७ रोजी ‘महावितरण अॅप’ संदर्भात कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी व्यासपीठावर श्री. पटनी, प्रशिक्षण विभाग, महावितरण, पुणे; श्री. कुमावत, प्रशिक्षण विभाग प्रमुख, महावितरण, रत्नागिरी आणि विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत डॉ. मिलिंद गोरे यांनी केले.

श्री. पटनी यांनी यांनी उर्जा क्षेत्रातील सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी बोलताना त्यांनी उर्जा देशाच्या प्रगतीतील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. तसेच उर्जा क्षेत्रातील संकटाचा उल्लेख केला. बदलत्या परिस्थितीत अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर करणे निकडीचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘उर्जा साक्षरता’ आणि ‘उर्जा व्यस्थापन’ या संज्ञांचा आढावा त्यांनी घेतला. महावितरणच्या ‘एमएसइडीसीएल अॅप’चा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महावितरणचे रत्नागिरी प्रशिक्षण प्रमुख श्री. कुमावत यांनी महावितरणच्या ‘एमएसइडीसीएल अॅप’चे प्रात्यक्षिक दाखवले आणि महावितरणचे बिल तसेच तक्रारींसंदर्भात या अॅपची उपयुक्तता स्पष्ट केली.

यावेळी प्रशिक्षणाला उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. भूषण ढाले यांनी केले. या कार्यक्रमाला विज्ञान मंडळाचे डॉ. मयूर देसाई, प्रा. शरद आपटे, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येनेउपस्थित होते.

Comments are closed.