gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामद्धे दि. २९ जुलै २०१७ रोजी कृतज्ञता समारंभ

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख कै. प्रभाकर नारायण देशमुख यांचे पुणे येथे वयाच्या ८५व्या वर्षी दुख:द निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या सुविद्य कन्या डॉ. सौ. मंजुश्री अरुण देवधर यांनी महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाला एक लाख रुपयांची देणगी देण्याचा संकल्प केला आहे.

त्याचा “कृतज्ञता समारंभ” दि. २९ जुलै २०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने कै. देशमुख सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि मित्र परिवाराने या कृतज्ञता समारंभास उपस्थित राहावे असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आवाहन केले आहे.

Comments are closed.
 
  • 2020 (9)
  • 2019 (161)
  • 2018 (158)
  • 2017 (184)
  • 2016 (37)