gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राज्यस्तरीय टेक्नोवेव्ह कॉम्पिटीशन २०१६-१७ संपन्न

Technowave- State Level Competition

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे राज्यस्तरीय “टेक्नोवेव्ह कॉम्पिटीशन २०१६-१७” चे अलीकडेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दहा महाविद्यालयातील एकूण ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते. वेब डेव्हलपमेंट, पॉवर पॉइंट, ब्लाइंड टायपिंग मास्टर आणि डीबगर कॉम्पिटीशन अशा चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांच्या परीक्षणाचे काम श्री. अवधूत आपटे, कु. कोमल भोसले आणि प्रा. मेधा सहस्रबुद्धे यांनी केले. विविध स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-

वेब डेव्हलपमेंट स्पर्धेतील विजेते- १) वरूण अनिल गद्रे (खरे ढेरे भोसले महाविद्यालय, गुहागर), २) श्रमिका अजित म्हाडेश्वर- (संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ) ३) रुपेश प्रदीप नवले- (व्ही.व्ही.डी. मॉडेल कॉलेज, तळेरे).

पॉवर पॉइंट स्पर्धेतील विजेते- १) सिमरन देशमुख (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), २) दिपाली गावकर (संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ), ३) स्नितन पावसकर (संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ).

ब्लाइंड टायपिंग मास्टर स्पर्धेतील विजेते- १) इम्रान खान (खरे ढेरे भोसले महाविद्यालय, गुहागर), २) तन्वी सावर्डेकर (ज्ञानदीप महाविद्यालय, खेड), ३) सिद्धी शिंदे (ज्ञानदीप महाविद्यालय, खेड).

डीबगर कॉम्पिटीशनमधील विजेते- १) अश्विनी पडेकर (ज्ञानदीप महाविद्यालय, खेड), २) नारायण राउळ (संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ) ३) वैष्णवी सावंत (संत राउळ महाराज महाविद्यालय, कुडाळ).

वरील सर्व विजेत्यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. राजीव सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. श्रावणी केतकर, विभागातील सर्व प्राध्यापक तसेच प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.