gogate-college-autonomous-logo

मराठी विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला सुयश

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या पहिल्या ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषद २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ. मयूर प्रभाकर देसाई यांनी सहभाग घेतला. या परिषदेमध्ये त्यांनी सदर केलेल्या ‘स्टीरिओकेमिस्ट्री सॉंफ्टवेअरला’ प्रथम दहा उत्तम सादरीकरणामध्ये स्थान मिळाले.

दि. १२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या परिषदेत नामवंत शास्त्रज्ञ तसेच मराठी विज्ञान परिषदेशी सलग्न महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. विज्ञान आणि गणित विषयातील अवगड संकल्पना सोप्या करण्यासाठी शिक्षकांतर्फे वापरण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक साधनाचे सादरीकरण सहभागी सुमारे १०० शिक्षकांनी केले. डॉ. मयूर देसाई यांनी सदर केलेल्या ‘स्टीरिओकेमिस्ट्री सॉंफ्टवेअर’ या शोधनिबंध सदरीकरणाला उत्तम दहा सादरीकरणामध्ये स्थान मिळाले. त्याबद्दलचे विशेष प्राविण्य प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

डॉ. मयूर देसाई यांच्या स्पर्धेतील या यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे तसेच मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरीचे विभाग समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.