gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नुकतीच ‘कौशल्य विकास कार्यशाळा’ संपन्न झाली. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि एम.के.सी.एल.चे कोलते कॉम्पुटर ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कला शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. संतोष कोलते यांनी ‘बी.ए. होत असतानाचे करिअर’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज इंग्रजी हि ज्ञान भाषा, संपर्क भाषा म्हणून विश्वस्तरावर मान्यता पावलेली भाषा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी इंग्रजी संभाषण कौशल्याबरोबरच संगणक कौशल्येही आत्मसात केली पाहिजेत या हेतूने त्यांनी एम.के.सी.एल. राबवत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाविषयी पीपीटी आणि डॉक्यूमेंटरीच्या माध्यमातून माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी आजचे युग हे कलायुग असून कला शाखेतील मुलांनाही भविष्यात खूप संधी आहेत. कला शाखेचे विद्यार्थीच खरेखुरे जीवन जगत असतात. आज परीक्षेतील गुण महत्त्वाचे नाहीत तर कलागुण, मुलभूत पायाभूत कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतात.

याप्रसंगी कु. प्रणाली मांजरेकर या विद्यार्थिनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यशाळेकरिता २५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन श्री. विकास पाचकुडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. निलेश पाटील यांनी केले.

Comments are closed.