gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शुभम हरचकर याची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेकरिता निवड

कोटा विद्यापीठ, कोटा, राजस्थान येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील शुभम हरचकर याची मुंबई विद्यापीठ पुरुष कबड्डी संघात निवड झाली होती. सदर स्पर्धेत मुंबई विद्यापीठ पुरुष कबड्डी संघाला कांस्य पदक प्राप्त झाले. शुभम याची मेंगलोर विद्यापीठ येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ पुरुष कबड्डी स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

स्पर्धेतील त्याच्या या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडासंचालक डॉ. विनोद शिंदे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, सर्व सदस्य, जिमखाना विभागातील कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.