gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि भारतीय कृषी अनुसंधान संस्था यांच्यात सामंजस्य करार संपन्न

reconciliation-agreement-concluded-between-gogete-joglekar-college-and-indian-agricultural-research-institute

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि गोवा येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची केंद्रिय कृषी अनुसंधान संस्था यांच्यात नुकत्याच एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि अनुसंधान संस्थेतर्फे डॉ. एकनाथ चाकूरकर सदर स्वाक्षऱ्या यांनी केल्या.

या सामंजस्य करारामधून मृद विज्ञान, जैव तंत्रज्ञान, मत्स्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र (औषधी वनस्पती) या विषयांच्या अनुषंगाने संशोधन प्रकल्प, ज्ञानाची देवाण-घेवाण, पदवी-पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण इ. सुविधा निर्माण झाल्या आहेत. तसेच राष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांचे आयोजन या सामंजस्य कराराअंतर्गत करण्यात येईल. तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी अनुसंधान संस्थेमद्धे प्रशिक्षण कार्यासाठी पाठविण्याचे निश्चित करण्यात आले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, अनुसंधान संस्थेचे डॉ. अजय पाठक, डॉ. गोपाळ महाजन, डॉ. शिवशरणअप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर सामंजस्य करार प्रस्थापित झाला.

Comments are closed.