gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी वर्षानिमित्त अभिवादन

समतावादी, लोककल्याणकारी लोकराजे, आरक्षणाचे जनक असे विविध नामाभिधान प्राप्त असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी वर्षानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हेबहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्याप्रास्ताविकपर मनोगतातून समारंभ समितीप्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कुलकर्णी यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजनकरण्यात आले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोरनेते होते. महात्मा जोतीबा फुले यांच्या मानवतावादी विचार आणि कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यांनी सामाजिक सुधारणांचे मोलाचे कार्य केले. बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केलेत. त्यासाठी शिक्षण संस्था, वसतिगृहे निर्माण केले. स्त्रियांची दास्यातून मुक्ती, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. स्त्रिया आणि बहुजन समाजावरील अन्याय दूर व्हावा म्हणून कोल्हापूर संस्थानात त्यांनीआवश्यक कायदे करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली, असे ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. शाहू मधाळे, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, विविध प्राध्यापक, समारंभ समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवर्ग आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समारंभ समितीचे प्रमुख प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.