gogate-college-autonomous-logo

राज्यस्तरीय आव्हान शिबिरात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा यशस्वी सहभाग

विद्यमान वर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर आव्हान, आयोजित केले गेले होते. कुलगुरू प्रो. विजय माहेश्वरी यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कु. समृद्धी लिंगायत, कु. कौशल मुसळे  या स्वयंसेवकांनी या दहा दिवशीय शिबिरात यशस्वी सहभाग घेतला . रत्नागिरी जिल्ह्याचे समूहाचे संघ व्यवस्थापक प्रतिनिधी कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ. दानिश गनी यांनी या शिबिरात सहभाग घेतला.

आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण जन जागृती,  आपत्ती कालखंडात घ्यावयाची काळजी,  आपत्ती नियंत्रण, पूर, आग, भूकंप, मानव निर्मित आपत्ती अशा प्रसंगात मानवी तसेच संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण स्वयंसेवकांना देण्यात आले. आपत्ती नंतरची स्थिती व काळजी याचेही मार्गदर्शन करण्यात आले. एन.डी.आर.एफ.च्या जवानांसोबत प्रत्येक्षिक करण्याची संधी स्वयंसेवकांना उपलब्ध झाली.सोबत सांस्कृतिक कलागुण, समुह कृतिसत्र, व प्रशिक्षण परीक्षा यांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्यातील २० विद्यापीठांतील ९८८ स्वयंसेवकांना या शिबिरात सहभागाची संधी प्राप्त झाली होती.उपलब्ध झालेल्या प्रशिक्षणाचा उपयोगअन्य स्वयंसेवकांसाठी करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना महाविद्यालयाचे  प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी देऊन शिबिरात सहभागी होऊन विभागाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल डॉ. दानिश गनी आणि स्वयंसेवकांचे विशेष अभिनंदन केले.

 

 

 

 

Comments are closed.