gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची चैतन्यमय तरुणाई

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची चैतन्यमय तरुणाई

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने 24 सप्टेबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.राष्ट्रीय सेवा योजना हा कार्यक्रम जेव्हापासून म्हणजेच २४ सप्टेंबर १९६९ पासून  आपल्या देशामध्ये सुरू करण्यात आला तेव्हा पासूनच गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये सुद्धा सदर कार्यक्रम  राबवला जातो.या वर्षी या  राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या कार्यक्रमाला सकाळ वार्तपत्रचे कोल्हापूर विभाग यीन समन्वयक श्री. अवधूत गायकवाड आणि  प्रा. सचिन सनगरे, समाजशास्त्र विभाग हे प्रमुख अतिथी लाभले. कार्यक्रमाचे उद्घाटन रोपट्याला पाणी देऊन करण्यात आले.सदर कार्यक्रमामध्ये पाहुण्यांनी कोविड 19 दरम्यान  विशेष कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांचे  कौतुक केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी रत्नागिरी  जिल्ह्यामध्ये 30पथनाट्य पोस्टर्स, व्हिडिओ सादर करून या महामारी दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती केली.  तसेच चिपळूण येथील पूरग्रस्तांना तत्काळ मदत पोचावण्याचे कार्य केले. सिद्धी सपरे, अस्थाना नार्वेकर,  हृषिकेश बांबडे, प्रतीक कांबळे, सुहानी गुरव, स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने 2019-20 च्या झेप आणि छंद उत्सव यातून मिळालेला नफा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला.राधा दाते, मेहेक खान, प्राची झोरे, रोहित वाडकर, स्वरूप भाटकर, आकाश मणचेकर, साक्षी गुप्ता, चैत्राली दळवी, राज माने यांनी रत्नागिरी शहर परिसरातून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली आणि आकाश मणचेकर मार्फत ती चिपळूण ला पोच केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले गेले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विद्यार्थी प्रदान करीत असलेला संजय जोशी पुरस्कार चा मानकरी संगम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रस्तावना करताना  एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सोनाली कदम यांनी महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली आणि कशा प्रकारे एनएसएस स्वयंसेवक आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींना संवेदनशीलतेने हाताळत असतात ते उद्धृत केले त्यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत अभिप्रेत वृक्ष कार्यक्रमाचा प्रयोग यशस्वी करताना एनएसएस क्या 300 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 5 झाडे आपापल्या राहण्याच्या ठिकाणी लावली आणि महाविद्यालयाचा 1500 वृक्ष लागवडीचा उपक्रमाला हातभार लावला.  तसेच कोविड 19  लसीकरण कार्यक्रमामध्ये नागरिकांना लसीकरण उपलब्धतेची माहिती देऊन मोबाईल वरून लसीच्या नोंदणी करता मदत केली याचा विशेष उल्लेख केला गेला.  प्रा. शिवाजी उकरंडे यांनी प्रमुख पाहुण्यांनी ओळख   करून दिली. सकाळ वार्तपत्राचे कोल्हापूर विभागिय समन्वयक श्री. अवधूत गायकवाड यांनी स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवून दिले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनएसएस गरजेचे आहे हे त्यांनी स्वानुभवातून विद्यार्थ्यांना सांगितले. आणि शक्य त्या सर्व शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना त्यांनी केले. प्रा. सचिन सनगरे यांनी नेतृत्व गुण विकासासाठी एनएसएस  चे महत्व सांगितले तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण या राष्ट्रीय सेवा योजनेमधूनच  कसे घडते ते सोदाहरण सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी स्वयंसेवक नेहमीच उत्साही असावा आणि कोणत्याही कामासाठी न लाजणारा असावा असे सांगितले. प्राचार्यांनी कार्यक्रमाला आवर्जून हजर असणाऱ्या माजी स्वयंसेवकांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे  आभारप्रदर्शन डॉ. दानिश गनी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका चैत्राली दळवी हिने  केले. कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली.

 

Comments are closed.