gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित ‘निसर्ग परिचय’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित ‘निसर्ग परिचय’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रम

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.विद्यमानवर्षी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दि. १८ आणि १९ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवसाचे अनिवासी निसर्ग परिचय शिबिर आयोजित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, गुहागर तालुक्यातील शाळांमधील 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दि. १८ एप्रिल या दिवशी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ज. शं केळकर सेमिनार हॉलमध्ये प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांच्या शभुहस्तेआणि विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ झाला. निसर्ग परिचय शिबिर उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

त्यानंतर वनस्पतीशास्त्र विभागप्रमखु प्रा. शरद आपटे यांनी शिबिरादरम्यान घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पहिल्या दिवसाच्या शिबिर सत्रात अनेक तज्ज्ञ मंडळींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय शिक्षणाबरोबरच निसर्ग परिचय करून घेणे किती आवश्यक आहे हे सांगताना निसर्ग म्हणजे काय ही संकल्पना विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शरद आपटेयांनी स्पष्ट केली. डॉ. सोनाली कदम यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनर्ध करताना वयाचे बंधन नसते असे विविध निसर्ग संवर्धकांची उदाहरणे देत सांगितले. विद्यार्थ्यांना निसर्ग परिचय करून देण्याच्या दृष्टीनेनिरनिराळ्या निसर्गाविषयक खेळांचे आयोजन करण्यात आले. डॉ. मधुरा मुकादम यांनी वैशिष्ट्यपूर्ण प्राणी या व्याख्यानादरम्यान विशिष्ट प्राण्यांबद्दल चलचित्रे विद्यार्थ्यांना दाखवली. यासोबतच पहिल्या दिवसाच्या शेवटी बांबूपासू विविध पर्यावरणपूरक वस्तू विद्यार्थ्यांनी श्री. हनमंतु जाधव यांच्या मार्गर्शनाखाली तयार केल्या.

प्रत्यक्ष अनभवातून निसर्ग परिचय करून देण्यासाठी दि. 19 एप्रिल 2023 रोजी शिबिरार्थींसाठी स्व. उत्तमराव पाटील जवैविविधता उद्यान, खानु आणि सामाजिक वनीकरण विभाग रोपवाटिका येथे निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होत. निसर्ग संवर्धनर्ध करण्यासाठी कोकणात जपली जाणारी वैशाष्ट्यपूर्ण अशा देवराई परंपरेबद्दल प्रा. शरद आपटे यांनी माहिती दिली. देवराई आणि जैवविवधता उद्यान येथेअसणाऱ्या विविध वनस्पती जसेकी नरक्या, हिरडा, बेहडा, अर्जुनर्जु , कडूकवठ, गायदळ, माकडनिंबू, किरमिरा, जांभूळ, सरुंगी, इ. वनस्पती, फुलपाखरे, पक्षी याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली.

विद्यार्थ्यानी यावेळी देण्यात आलेली माहिती आपल्या नोंदवहीत नोंदवली. यानंतर विद्यार्थ्यानी अल्पोपहाराचा आनंद घेतला. श्री. प्रकाश पाटील वनक्षेत्रपाल, लांजा यांच्या हस्ते सर्व शिबिरार्थीना प्रमाणपत्र देवनू गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या देशातील वन्यप्राण्यांच्या संख्येवर आणि त्यात वारंवार होंत असलेल्या बदलास कारणीभतू असणाऱ्या मानवी हस्तक्षेपाचा दाखला देत, निसर्ग वाचवणं का गरजेचं आहे हे त्यांनी समजावले आणि विद्यार्थ्यांची निसर्गविषयक भविष्यातील भमिूका काय आहे याबद्दल प्रेरणा दिली. शिबिराच्या समाप्तीला छोट्या विदयार्थी मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि भविष्यात अशा शिबिराचा कालावधी तीन किंवा पाच दिवसांचा असावा,अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली. या दोन दिवसाच्या शिबिरासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे आणि प्रा. परेश गुरव यांनी विशेष प्रयत्न केले.

Comments are closed.