gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उर्दू राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

भाषेच्या विकासाबरोबर संस्कृतीचा विकास होत असतो, परंतु सद्यकालीन परिस्थितीत इंग्रजीच्या प्रभावामुळे भारतीय भाषांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, म्हणून विविध भाषांमधील साहित्याचे आदान-प्रदान होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘दैनिक सकाळ’रत्नागिरीचे आवृत्ती प्रमुख श्री. शिरीष दामले यांनी केले. र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगीते बोलत होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभागाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून उर्दू विभाग आणिराष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Indian Socio – Cultural Background of Urdu Proverbs and Idioms’ या विषयावरील आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन श्री. शिरीष दामले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत आणि दीपप्रज्वलनाने झाली.

श्री. दामलेपुढेम्हणाले, प्रदेश कोणताही असला तरी मानवी भावना सारख्याच असतात. भाषेचा अभ्यास करताना व्याकरणाचा अभ्यासही महत्वाचा ठरतो, इंग्रजीच्या प्रभावामुळे भारतीय भाषांपुढे अनेक आव्हाने निर्माणझाली असून, मातृभाषेतून जेव्हा विद्यार्थी शिकतील, समाजातभाषेचे आदानप्रदान घडून येईल तेव्हा ते आपले ज्ञान अधिकाधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त करू शकतील. तसेच भाषा आणि तिचे समाजातील उपयोजन, कोरोनामुळे लोकांच्या जीवनात घडून आलेले भाषिक बदल यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.

बीजभाषक ख्यातनाम कवी, समीक्षक आणि पत्रकार शमीम तारिक यांनी भारतभूमी आणि उर्दू भाषा यांचा पूर्वीपासून जवळचा संबंध असून, उर्दू भाषेने भारतीय भाषा, साहित्य आणिसंस्कृतीच्या इतिहासात मोलाची भर घातली आहे. उर्दूने या प्रदेशाला एक नवीन संस्कृती प्रदान केली आहे. आज प्रचलित असलेल्या विविध म्हणी भारतीय प्रदेशातून उदयाला आल्या असून,राजकीय आणि सामाजिक जीवनात निर्माण झालेल्या तत्कालीन परिस्थितीतून या म्हणी लोकांच्या भाषेत रूढ झाल्या आहेत, असे ते म्हणाले. जेव्हा उर्दू भाषेचा आणि फाळणीचा संबंध जोडला जात होता त्या परिस्थितीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उर्दू विभागाची स्थापना होणे, हा महाविद्यालयाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरला आहे. गेल्या काही वर्षात उर्दू विभागाने उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध चर्चासत्र, परिषदा आदि उपक्रमांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
प्रमुख अतिथी डॉ. मोहम्मद काझीम यांनी भारतीय भाषांमधील म्हणी आणि वाक्यप्रचार यांच्यातील भेद आणि वेगळेपण सांगून, म्हणी आणि वाक्यप्रचारातून भाषेचा प्रचार-प्रसार होतो. तसेच प्रदेशनिहाय भाषेत बदल होत असतो, दैनंदिन जीवनात हे बदल लगेच दिसून येतात. त्यामुळे भाषा अधिकाधील समृद्ध होते, असे त्यांनी पुढे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आतापर्यतच्या प्रगतीचा लेखाजोगा सांगून, प्रा. डॉ. मोहम्मद दानिश गनी यांच्या नेतृत्वाखाली उर्दू विभाग उर्दू भाषा आणि साहित्याचा प्रचार-प्रसार महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीच्या बाहेर करून आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. विभागाचे हे कार्य वाखणण्याजोगे असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी नागपूर येथील प्रसिद्ध कवी आणि लेखक डॉ. अब्दुल रहीम नश्तर यांच्या ‘बच्चोंका संसार’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहम्मद दानिश गनी यांनी तर आभारप्रदर्शन कला शाखा उपप्राचार्य प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.

या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रा. मोहंम्मद काझीम (उर्दू विभाग, दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली)डॉ. अब्दुल्ला इम्तियाझ अहमद (विभागप्रमुख, उर्दू विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), डॉ. कुदसिया नसीर (उर्दू विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विविध सत्रांमध्ये देशभरातून आलेल्या विविध उर्दू भाषेच्या संशोधक, अभ्यासकांनी आपापल्या शोधनिबंधाचे वाचन करूनउर्दूच्या विकासातील टप्पे, पैलूयावर प्रकाश टाकला..
या राष्ट्रीय चर्चासत्रात अतिथीम्हणून सुप्रसिद्ध पत्रकार रफिक मुकादम, शौकत काझी (सेवानिवृत्तशिक्षण अधिकारी, जि.प. रत्नागिरी) ‘कोंकण कि आवाज’ साप्ताहिक आणि‘दैनिक रायगडचीआवाज’, महाड, चे मुख्य संपादक श्री. दिलदार मोहम्मद शफी पुरकर, ए. डी. नाईक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. समीर गडबडे, D.I.E. T. रत्नागिरीचे श्री. मुनाफ गुहागरकर, मेस्त्री हायस्कूलचे श्री. अझमत अली कास्मी, श्रीमती साजिदा बिजापुरी, श्रीमती शाईझा अस्फाक नाईक, श्रीमती नादिरा इक्बाल करवीनकर आदि मान्यवर उपस्थित होते.

या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी लेखक डॉ. अब्दुल रहीम नश्तर, श्री. शफ्रुद्द्दिन साहिल, सामाजिक कार्यकर्ते श्री. अस्लम दाउद शिरगावकर, श्री. परवेझ साजिद अस्सी आदि मान्यवर उपस्थित होते. हे चर्चासत्र गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपन्न झालेअसल्याने हा क्षण संस्था, महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी व्यक्त केले.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, उर्दू विभागप्रमुख प्रा. मोहम्मद दानिश गनी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. कुमार काकतकर, विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, उर्दू विभागाचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चर्चासत्राला उर्दूचे जाणकार आणि रसिक यांची उपस्थिती लाभली. महराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ यांच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

Comments are closed.