gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि वालचंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘म्युच्युअल मेलडीज’ कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि वालचंद महाविद्यालय, सोलापूर यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही महाविद्यालयांच्या इंग्रजी विभागातर्फे ‘म्युच्युअल मेलडीज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथे नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला. दोन्ही महाविद्यालयांच्या इंग्रजी विषयाच्या विद्यार्थांनी एकमेकांच्या अभ्यासक्रमातील कवितांवर आधारित नाविन्यपूर्ण असा हा प्रायोगिक कार्यक्रम केला. काव्य वाचन, पॉवर पॉइंट प्रेसेंटेशन, दृक्श्राव्य फित आणि नाट्य रुपांतर अशा वैविध्यपूर्ण माध्यमांतून विद्यार्थांनी सादर केलेल्या कविता सर्वांनाच भावल्या.

या कार्यक्रमाकरिता गो. जो. महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अतुल पित्रे, प्रा. वासुदेव आठल्ये, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. मधुरा आठवले-दाते, प्रा. तेजस भोसले तर वालचंद महाविद्यालयाचे प्रा. मनोहर जोशी आणि प्रा. शिंदे उपस्थित होते. वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. माणिकशेट्ये आणि हिराचंद महाविद्यालयाचे प्राचार्य व इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. कोटी यांनीही कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली आणि या शैक्षणिक उपक्रमाची प्रशंसा केली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर आणि वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. माणिकशेट्ये यांचे कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वितेसाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.