gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सव – २०२३ चे शानदार उद्घाटन

mumbai-university-yuva-mahotsav-udghatan

सांस्कृतिक युवा महोत्सव म्हणजे आपल्यातील ‘स्व’ ओळखून कला सादर करण्याची संधी – शिल्पाताई पटवर्धन

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव– २०२३चे शानदार उद्घाटन र. ए. संस्थेचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

महाराष्ट्र तसेचमुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विश्वात एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा लौकिक आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाविश्वात महाविद्यालयाचे एक आगळेवेगळे स्थान असून,सळसळत्या तरुणाईच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय कायमच प्रयत्नशील असते. विद्यार्थांना त्यांचे कलागुण सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळते ते महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव ‘झेप’च्या माध्यमातून. विद्यापीठाच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्याविविध सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजनही महाविद्यालयात करण्यात येते. विद्यमान वर्षी मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या आंतरमहाविद्यालयीनसांस्कृतिक युवा महोत्सव– २०२३ चेमहाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचेउद्घाटनर. ए. संस्थेच्याकार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते थाटातसंपन्न झाले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत आणि युवा महोत्सवगीताने झाली. कार्यक्रमाच्याप्रारंभी केंद्र शासनाच्या वतीनेआयोजित‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांतर्गतमहाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी उपस्थितांना शपथ दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात रत्नागिरी जिल्हा समन्वयक आणि गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे सांकृतिक विभागप्रमुखप्रा. डॉ. आनंद आंबेकर यांनी महोत्सवासंदर्भात आपल्या महाविद्यालयीन आठवणीना उजाळा देऊन हा युवा महोत्सव आयोजनामागील हेतू, त्याची रचना, तसेचया महोत्सवाच्या माध्यमातून कलेच्या क्षेत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यायातूनबाहेरपडलेल्या आणि सध्या विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आलेख उपस्थितांसमोर सादर केला.

मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे यांनीविद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवातून विद्यार्थांना एक आत्मविश्वास मिळतो. कलेच्या क्षेत्रात या विद्यापीठाच्या महोत्सवानेविविध कलाकार घडवले आहे, असे सांगितले.

आपले मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णीयांनीरत्नागिरी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय म्हणजेकलेची एकखाणआहे, असे सांगून यामहोत्सवातविद्यार्थ्यांनी आपली कला अत्यंत आत्मविश्वासपूर्वक, सुंदर रीतीने सादर करावी, असे आवाहन उपस्थितांना केले.

आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, प्रत्येक माणसात कुठला तरी सुप्त गुण, कला दडलेलीअसते. माणसाची उत्पत्तीच सप्त स्वरातून झाली आहे. माणसाला आपल्यात लपलेल्या गुणाचासाक्षात्कार होणे, स्वत: मधील‘स्व’ ची ओळख होणे खूप अवघड गोष्ट आहे. पण अशा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यातील ‘स्व’ ची ओळख होऊन आपली कला सादर करण्याची संधी मिळते. सुरुवातीच्या काळात कला, तिच्यातून मिळणारा आनंद हा केवळस्वत:पुरताच मर्यादित होता. परंतु आता कलेचे व्यावसायीकरण झाले आहे, हीअत्यंत महत्वाची बाब आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री. निलेश सावे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. आनंद आंबेकर, सहसमन्वयक प्रा. संयोगिता सासणे आदि मान्यवर उपस्थित होते.

एक दिवस रंगणाऱ्या या तरुणाईच्या सांस्कृतिक महोत्सवात विविध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकनृत्य, एकांकिका, एकपात्री अभिनय, नृत्य, संगीत, गायन, वादन, वादविवाद, कथाकथन, मातीकाम, रांगोळीअशा जवळजवळ ४० कला प्रकारातील स्पर्धा संपन्न झाल्या. विविध कार्यक्रमांची रेलचेल त्यात पाहायला मिळाली. दक्षिण रत्नागिरी झोन मधून सुमारे १६ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कला उपासक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरातील मंदिरात केलेल्या श्रीगणरायाच्या आरतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

याप्रसंगी सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर परीक्षक, विविध विषयांचे विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या आणि नेतृत्व गुणांचा विकास करणाऱ्या या महोत्सवाच्या संयोजनासाठी रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील त्यांचे सहकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.

Comments are closed.