gogate-college-autonomous-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘काव्यविषयक ग्रंथप्रदर्शन’ संपन्न

library

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात सहकार भित्तीपत्रकाचे औचित्यसाधून ‘काव्यविषयक’ ग्रंथांचे प्रदर्शन संपन्न झाले. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हणाले की, कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारे कविता हे अत्यंत प्रभावी असे माध्यम आहे. अनेक कविता आपल्या मनात कायमच्या घर करून रहातात. विद्यार्थ्यांनी केलेल्या कविता खूप उत्तम असून यामद्धे त्यांची काव्यविषयक प्रतिभा दिसून येते. या नवकविंमधूनच उद्याचे भावी कवी तयार होणार आहेत. या उपक्रमातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन साहित्यनिर्मिती करावी. असे बोलून आजचे ग्रंथप्रदर्शन नेहमीप्रमाणेच खूप कल्पक आहे; विद्यार्थ्यांनी याचा आस्वाद घ्यावा असे नुमूद केले.
या ग्रंथप्रदर्शनात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषांतील निवडक काव्य संग्रह प्रदर्शित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या कविताही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या.
या सोहोळ्याला उपप्राचार्य अशोक पाटील, प्रा. विशाखा सकपाळ, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. आरती सरमुकादम, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

library
library
library
Comments are closed.