gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ विविध उपक्रमांनी साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिनानिमित्त घेतलेल्या मुख्य कार्यक्रमात ‘सोशल मिडिया पर हिंदी का प्रभाव’ या विषयावर डॉ. राहुल मराठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सामाजिक माध्यमावर हिंदी भाषेचे प्रभुत्व कसे वाढत आहे यासंबंधी अनेक उदाहरणे देऊन विश्लेषण केले. माध्यमांतील हिंदी भाषेचा वापर आणि प्रभाव याची जाणीव विद्यार्थ्यांनी करून घेऊन हिंदी भाषेचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात वाढविला पाहिजे आणि अधिक अभ्यासपूर्ण दृष्टीकोनातून हिंदी भाषेकडे पहिले पाहिजे असे नमूद केले.

वाङ्मय मंडळ आणि हिंदी भाषा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ‘राष्ट्रवाणी’ या विद्यार्थी लिखित भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रभाषा दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनुक्रमे कु. मानसी शेट्ये, श्रद्धा हळदणकर, वेदिका चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. कु. स्नेहा घडशी, कल्पेश पारधी आणि स्नेहल भातडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हिंदी दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयातील अनेक विभागांनी आपले दैनंदिन अध्यापन हिंदी भाषेतून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. शाहू माधाळे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. चित्रा गोस्वामी यांनी करून दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांची उपस्थिती लाभली होती. उपस्थातांना संबोधित करताना त्यांनी हिंदी भाषेच्या वाढत्या महत्वावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या हिंदी विभागात पदवी ते पीएच.डी. पर्यंतच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उचित लाभ करून घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी हिंदी विभागातील विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमास वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, हिंदी भाषा प्रेमी, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ विविध उपक्रमांनी साजरा
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘हिंदी दिन’ विविध उपक्रमांनी साजरा
h
Comments are closed.