शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता एम.एस्सी., भाग-१ या वर्गाचे गुणवत्ता यादीसाठीचे अर्ज दि. ०७ जुलै २०१८ पर्यंत भरून द्यावयाचे आहेत. या वर्गाकरिता प्रवेश गुणवत्ता यादीनुसार देण्यात येईल. अर्ज भरताना सेमिस्टर १ ते ६ परीक्षांच्या गुणपत्रकांच्या झेरॉक्स प्रति, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र झेरॉक्स (आवश्यक असल्यास), दोन रंगीत फोटो, आवश्यक आहेत.
मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी इ. १०वि पासूनची सर्व मूळ गुणपत्रके आणणे आवश्यक आहे. दिनांक ०९ जुलै २०१८ रोजी गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्यात येईल. एम.एस्सी. भाग-१ या वर्गासाठी Physics, Chemistry (Analytical & Organic), Biotechnology, Mircobiology, Mathematics या विषयांना प्रवेश देण्यात येतो. सादर अर्ज महाविद्यालयाच्या कार्यालयात मिळतील. असे प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर यांनी कळविले आहे.
