gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रतिवर्षीप्रमाणे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४४वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला श्री. प्रमोद जाधव, उपायुक्त, समाजकल्याण आणि अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून लाभले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शिक्षण विषयक तळमळ, द्रस्टेपणा, समाज सुधारणा, आरक्षण विषयक समानतेचे धोरण, कलात्मक दृष्टी असे विविध पैलू रयतेच्या राजाचे वेगळेपण आपल्या विचारातून व्यक्त केले. तसेच जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र याविषयी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला स्पर्श करत कोल्हापूरचे वेगळेपण विषद केले आणि त्यांच्या कार्याचे मोठेपण व्यक्त केले.
कार्यक्रमाला विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे, अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक पाटील, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि अभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.

Shahu Maharaj Jayanti Celebration
Shahu Maharaj Jayanti
Comments are closed.