gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १७ व १८ मार्च २०१८ रोजी ‘कोस्टल वेस्टलॅड ऑफ इंडिया’ या नावाची राष्ट्रीय परिषद होत आहे. मॅग्रुव्ह सेल, मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडिया व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत खारफुटी वने व पाणथळ जागा यांचे संवर्धन व विकास या विषयांतील अनेक तज्ञ व मान्यवर व्यक्तींची व्याख्याने होणार आहेत. यामद्धे फॉरेस्ट मॅग्रुव्ह सेलचे मुख्य संवर्धक डॉ. एन. वासुदेवन; मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. अरविंद उंटावले; मॅग्रुव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे संयुक्त सचिव डॉ. विनोद धारगळकर; बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. दीपक आपटे; डॉ. प्रदीप मुकादम, डॉ. नंदिनी वाझ, डॉ. शिरधनकर, डॉ. ठाकुरदेसाई, अॅड. संध्या सुखटणकर, डॉ. निरंजना चव्हाण, डॉ. स्वप्नजा मोहिते यांचा समावेश आहे. तसेच या परिषदेत जैवविविधता या विषयावरील विविध शोधनिबंधांचे सादरीकरण देखील होणार आहे.

या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता व खारफुटी या विषयवार छायाचित्रण व भित्तीपत्रक या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाणथळ वनस्पती सागरी किनाऱ्याच्या संरक्षण व संवर्धनात महत्वपूर्ण भूमिका पार पडतात. रत्नागिरी जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जैवविविधतेने संपन्न आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनाचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या परीषदेचा प्रमुख उद्देश आहे.

सदर परिषेदेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या बायोलॉजिकल सायन्सेस विभागाचे प्रमुख तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.