gogate-college

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आद्य देणगीदार ‘गोगटे स्मृतिदिन’ साजरा

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचा ७ जुलै हा स्मृतिदिन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी बोलताना श्रीम. शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या कि, शैक्षणिक कार्याला मदत करण्याची भूमिका आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांनी त्या काळात दाखविली. त्यांनी १९४५ साली संस्थापकांकडे आपले वडील कै. र. प. गोगटे यांचे नाव देण्यात आलेले हे महाविद्यालय आज समाजात मानबिंदू ठरले आहे. सुरुवातीच्या काळात कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांच्या समाजोपयोगी कार्याला हातभार लावणाऱ्या कै. कै. नारायण रघुनाथ गोगटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण सर्व त्यांची आठवण करतो असे त्यांनी नमूद केले आणि कै. गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, डॉ. अपर्णा कुलकर्णी, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.