gogate-college

मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन युवा महोत्सव-2018

मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन युवा महोत्सव-2018 ‘या महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद आणण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची क्षमता आहे’- प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर

५१व्या मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन ‘युवा महोत्सवाची’ तयारी करण्यासाठी विद्यार्थी विकास विभाग, मुंबई विद्यापीठ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रत्नागिरी जिल्हा युवा महोत्सव सांस्कृतिक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठातर्फे युवा महोत्सव समन्वयक डॉ. निलेश सावे उपस्थित होते. याप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील २२ महाविद्यालयांचे सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले की, २०१६-१७ यावर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उपविजेतेपद प्राप्त झाले होते. तर भविष्यात सुनियोजित प्रयत्न आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखल्या तर कोकणातील महाविद्यालयांना सर्वसाधारण विजेतेपद सुद्धा प्राप्त होऊ शकते.
कार्यशाळेचे नियोजन मुंबई विद्यापीठ जिल्हा समन्वयक प्रा. आनंद आंबेकर यांनी केले. सह-समन्वयक म्हणून प्रा. उदय बामणे आणि प्रा. राहूल कोतवडेकर यांनी उत्कृष्टरित्या काम पहिले.
मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या सुमारे ८२ कलाप्रकारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काय केले पाहिजे याविषयी डॉ. निलेश सावे यांनी मार्गदर्शन केले. श्री. विजय जाधव यांनी दिमडी, ढोलक, ढोलकी यांचे प्रात्यक्षिक देऊन कार्यशाळेत रंग भरला. श्री. विजय जाधव आणि श्री. अमोल बावकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे कलाकार आहेत.
जुलै अखेरीस इस्त्राईल येथे मुंबई विद्यापीठाने तयार केलेला कार्यक्रम सादर करण्यासाठी जात आहेत. या चमूमद्धे रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. युवा महोत्सवातुन अनेक व्यावसायिक कलाकार यशस्वी झाले आहेत. याविषयाची सविस्तर माहिती प्रा. आनंद आंबेकर यांनी दिली.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री. प्रसाद गवाणकर, श्री. कुमार काकतकर, श्री. महेश सरदेसाई, श्री. विजय गुरव यांनी तर विद्यार्थ्यांमध्ये ओम पडाळकर, तन्मय सावंत, शैलेश इंगळे, मयूर भाटकर यांनी तसेच माजी विद्यार्थी अभिजित मांजरेकर आणि ओंकार बंडबे यांनी काम पहिले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली

Comments are closed.