gogate-college-autonomous-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भारतीय कालगणनेवर विशेष व्याख्यानाचे आयोजन

gjc-lecture-on-indian-chronology

गोगटे जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पी. व्ही. काणे अध्ययन केंद्र यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी या कराराच्याद्वारे संस्कृतमधील अनेक विषय आदानप्रदान करण्याचे ठरले. त्यानुसार दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत गोगटे जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग आणि कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील भारतरत्न डॉ. पी. व्ही. काणे अध्ययन केंद्र यांनी संयुक्तपणे भारतीय कालगणना या विषयावर सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून दि. २६ मार्च २०२२ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे भारतीय कालगणना या विषयावर विशेष आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना असलेल्या अनेक शंकांचे निरसन केले. तसेच अनेक शास्त्र आणि भारतीय कालगणना यांचा परस्पर संबंध विशद केला. सार्वकालिक भारतीय कालगणनेचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी कलाशाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई उपस्थित होते. त्यांनी यावेळी ज्योतिष, भूगोल, भूमिती अशा विविध शास्त्रांचा परस्पर संबंध विद्यार्थ्यांनी या कालगणनेच्या द्वारे अभ्यासावा आणि त्यातून अनेक प्रकारे असलेल्या संशोधन संधींचा विचार करावा, त्याद्वारे निसर्गातील अनेक भौगोलिक, भौमितिकचक्र आपल्याला उलगडतील असे सांगितले.

संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी उपस्थितांचे स्वागत करून या विशेष व्याख्यानाचे प्रयोजन सांगितले. या व्याख्यानाला भौतिकशास्त्र विभागातील ज्येष्ठ प्रा. बाबासाहेब सुतार विशेषत्वाने उपस्थित होते आणि त्यांनी भारतीय कालगणना या विषयावर सुरू असलेल्या सर्टिफिकेट कोर्सबद्दल मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर संस्कृत विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.